भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवत रचला इतिहास

0

बर्मिगहॅम :

तुम्हाला 2007 चा टी-20 वर्ल्डकप आठवतो का? 2007 साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सहा चेंडूंमध्ये सहा षटकार मारले होते. त्याचीच काहीशी पुनरावृत्ती आज पाहयला मिळाली. आज इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला. ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजाने पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडविले. आणि एक नवा इतिहास घडविला.

बर्मिगहॅम येथे इंग्लड व भारत यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. ११ व्या षटकामध्ये बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई केली. एक वाइड आणि एका नो बॉलच्या जोरावर बुमराहने या षटकामध्ये तब्बल ३५ धावा कुटल्या. या षटकामधील शेवटचा चेंडू वगळता प्रत्येक चेंडू बुमराहने सीमेपार धाडला. जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी करताना भारताची धावसंख्या 416 पर्यंत नेली. भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. जेम्स अँडरसनने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. 84व्या षटकात जसप्रीतने कहर केला. ब्रॉडच्या त्या षटकात 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1 अशा एकूण 35 धावा आल्या. कसोटी क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक ठरले. जसप्रीतची फटकेबाजी पाहून ब्रॉडला 2007 साली युवराज सिंगने दिलेला झटका आठवला असेल. युवीने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये सहा षटकार खेचून 36 धावा चोपल्या होत्या.

कर्णधार जसप्रीत बुमराहने केली. त्याने ब्रॉडच्या एका षटकात 29 धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. जसप्रीतची फटकेबाजी पाहून महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला युवराज सिंगची आठवण झाली आणि त्याने खास ट्विटही केले. ब्रॉडच्या त्या षटकात एकूण 35 धावा आल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ते सर्वात महागडे षटक ठरले. या पूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता. त्याने २००३ साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात २८ धावा काढल्या होत्या.

See also  भारताचे दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले.