अंतर्गत भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त : संदिप भोंडवे

0

पुणे :

मागील काही दिवासांपासून राज्याताली कुस्तीगीर परिषदेत वाद सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष होते. भारतीय कुस्तीगीर महासंघाने ही कारवाई केली आहे. त्यानंतर आता पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्र सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांच्या नावाचा फक्त या पिता-पुत्रांनी वापर केला आहे. आज राज्यात जी कुस्ती मागे आली आहे, त्याला फक्त आणि फक्त बाळासाहेब लांडगे हेच जबाबदार आहेत, असा आरोपही भोंडवे यांनी लांडगेंवर केला आहे.

“शरद पवारांच्या नावाचा वापर” – पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप भोंडवे म्हणाले की, भारतीय कुस्ती महासंघाने घेतलेल्या निर्णयाला राजकीय स्वरुप देण्याचं काम केलं जातं आहे. पण, तसं काहीच नाही. बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा ललित लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लांडगे आणि त्यांच्या मुलाने कुस्तीगीर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. गेली 50 वर्ष बाळासाहेब लांडगे हे राज्य कुस्ती परिषदेचं काम पाहत आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा फक्त या पिता-पुत्रांनी वापर केला आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली. आज राज्यात जी कुस्ती मागे आली आहे, त्याला फक्त आणि फक्त बाळासाहेब लांडगे हेच जबाबदार असल्याचा आरोपही भोंडवेंनी केला आहे.

“10 ते 15 वर्षांत भ्रष्टाचार” – हिंदकेसरी योगेश दोडके यांनी म्हटलं की, राज्यातील 45 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांनी बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून राज्य कुस्तीगीर परिषदेत भ्रष्टाचार करणे, स्पर्धा न घेणे, जिल्हा संघटनांवर जाणून बुजून कारवाई करणे हेचं काम या पिता-पुत्रांनी केलं असल्याचं दोडके यांनी सांगितलं.

संदीप भोंडवे आणि योगेश दोडके प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

See also  खेलो इंडीया स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्‍या कबड्डी संघाची अंतिम फेरीत धडक

काय आहे प्रकरण? – देशात हरियाणानंतर कुस्तीमध्ये महाराष्ट्राचे नाव घेतलं जातं. राज्य कुस्तीगीर परिषदेस आतापर्यंत २३ आणि १५ वर्षांखालील दोन राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे निर्देश दिले होतो. मात्र, त्यांनी यापैकी एकही स्पर्धा आयोजित केली नाही. संघटना काहीच काम करत नसल्याचं वेळोवेळी निदर्शनास आलं आहे. तसेच, त्यांच्यावर करण्यात आलेलं आरोपही गंभीर होते. त्यामुळे राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.