अर्जेंटीनाचा ३-० ने धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघ प्रो-लिग स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल..

0
slider_4552

प्रो-लिग :

सलामीच्या सामन्यात नेदरलँडकडून १-४ ने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय हॉकी संघाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. अर्जेंटीनाचा ३-० ने धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघाने प्रो-लिग स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे.

सध्याच्या घडीला भारताच्या खात्यात १४ सामन्यांत २७ गुण जमा झाले आहेत. भारताने या दरम्यान ग्रेट ब्रिटनला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने ३३ व्या मिनिीटाला गोल करत संघाचं खातं उघडलं. ज्यानंतर ३९ व्या मिनीटाला अमित रोहिदासनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावला. सामना संपायला एक मिनीट बाकी असताना अभिषेकने मैदानी गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

परतीच्या सामन्यात भारतासमोर शनिवारी पुन्हा एकदा नेदरलँडचं आव्हान असणार आहे. यंदाच्या वर्षात भारतीय संघासमोर आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पिअन्स ट्रॉफी अशा दोन महत्वात्या स्पर्धा आहेत. त्याआधी भारतीय संघाचा युरोप दौरा त्यांना फायदेशीर ठरु शकतो.

See also  भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा येथील डायमंड लीग जिंकली..