माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने दहावी आणि बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर चे आयोजन.

0

औंध :

नुकताच दहावी आणि बारावी निकाल जाहिर झाला. या महत्वाच्या टप्प्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. अशा प्रभाग क्र १२ औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील दहावी आणि बारावी परीक्षेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने आज सायंकाळी ५ : ०० वाजता औंध येथे पं. भीमसेन जोशी कलामंदिर औंध येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, आयुष्याच्या वळणावरती शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करत असताना दहावी आणि बारावीचे वर्ष म्हणजे उच्च शिक्षणात योग्य क्षेत्र निवडण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असते. अशावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन घडविणे गरजेचे आहे. शिवाय त्यांनी या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये संपादन केलेले यशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्दिष्टाने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील मिळणार आहे. यावेळी परिसराचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. औंध, बालेवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील दहावी आणि बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांनी 8308123555 या नंबर वरती संपर्क साधून आज सायंकाळी आपला सन्मान घेण्याकरता उपस्थित रहावे.

 

See also  ॲड. मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त औंध आयटीआय येथे वृक्षारोपण...