राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना महाराष्ट्र विधानसभा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान

0

पुणे :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मुंबई येथील विधानभवनामधील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राज्य सरकारच्या राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी शिरोळे यांची निवड करण्यात आली होती

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध प्रश्न मांडत असतांनाच राज्यातीलही अनेक विषय सभागृहात प्रभावीपणे मांडले होते. समस्या मांडत असतांनाच त्या सोडवण्यासाठीच्या सूचना करीत सभागृहात छाप पाडणार्या शिरोळे यांना उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान करीत गौरवण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक सभागृहात प्रभावी मांडणी केली.

See also  मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी रस्त्यांची संयुक्त पाहाणी करून प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी घेतला आढावा