ॲड. मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त औंध आयटीआय येथे वृक्षारोपण…

0

औंध :
रोटरी क्लब ऑफ बाणेर, सह्याद्री देवराई आणि औंध आयटीआय यांच्या माध्यमातून ॲड. मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून घनवान जंगल आणि नक्षत्र गार्डन असा वृक्षारोपणाचा आपला वेगळा कार्यक्रम औंध आयटीआय येथे आयोजित करण्यात आला. या प्रकल्पाला सगळ्यात मोठे योगदान सत्यनारायण काबरा यांनी दिले. काबरा व धनंजय शेवाळे सहयाद्री देवराई यांनी मिळून सायंटिफिक झाडांचे नियोजन केले तिन आटवड्यात एवढा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. QR CODE प्रत्येक झाडाला दिला जाणार आहे. त्यामुळे लावल्या जाणाऱ्या झाडांची महिती लगेच मिळणार आहे. घनवन प्रकल्पांमध्ये ३०८ वेगवेगळ्या प्रकारची देशी झाडे लावली जाणार आहे.

नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले की, रोटरी क्लब नेहमीच सुंदर आणि चांगले कार्यक्रम घेतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामात सहकार्य करायला आवडते मुसळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. पुढे बोलताना त्यांनी प्रभागांमध्ये होणारे विविध विकासकामांची माहिती दिली.

वाढदिवसाचे निमित्त साधून हा कार्यक्रम घेण्यात आला तेव्हा ॲड. मधुकर मुसळे यांनी बोलताना रोटरी क्लब बाणेर सह्याद्री देवराई शासकीय आयटीआय औंध यांचे आभार मानले, वृक्षारोपण करताना बरेच लोक फक्त दिखाव्यासाठी वृक्षारोपण करतात तसे न करता लावलेली झाडे वाढली गेली पाहिजे. केवळ दिखावा म्हणून वृक्षारोपण नसावे. वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीच वृक्षारोपण करत असतो हे त्यांनी नमूद केले. ह्या आगळ्यावेगळ्या वृक्षारोपण यामुळे इथे तयार होणारे घनदाट जंगल आणि नक्षत्र गार्डन पहायला लोक आवर्जून येतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, विकास कामाच्या माध्यमातून औंध प्रभागाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपनगर बनणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे रूपरेषा आणि माहिती सत्यनारायण काबरा यांनी सगळ्यांना सांगितली. नियोजनपूर्वक लावल्या जाणाऱ्या झाडांची माहिती क्यू आर कोड द्वारे सर्वांना समजणार आहे सांगितले. या कामासाठी ॲड. मुसळे व नगरसेविका अर्चना मुसळे यांनी फार मोठे योगदान दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपनाची तीन वर्ष काळजी घ्यावी लागेल त्यानंतर हे वृक्ष आपली काळजी घेतील आपल्याला ऑक्सिजन देतील असे त्यांनी सांगितले.

See also  औंध येथे महाविद्यालयाचे प्राचार्य यांची आत्महत्या !

यावेळी नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, रोटरी क्लब बाण्याचे प्रेसिडेंट मिस्टर संकेत, सत्यनारायण काबरा, पुणे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर समीर, डॉक्टर प्रकाश सायगावकर, अनिल गावित, असिस्टंट गवर्नर बलबीर चावला, मयूर मुंडे, आयटीआय मधील कामगार, रोटरी क्लबचे सदस्य औंध जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.