औंध :
इंदिरा वसाहत येथे स्वातंत्र्य दिन निमित्त उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई प्रतिष्ठान व संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
साण्विका गायकवाड या छोट्या मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आकाश खवले, रवी गायकवाड, विनायक सोनवणे, राजु खवले, प्रभाकर वाघमारे, दत्ता रणदिवे, अवी वाघमारे आदी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.