नववर्षाच्या पूर्वसंध्येला औंध येथे ‘दारू नको दूध प्या’ अभिनव उपक्रम.

0

औंध :

३१ डिसेंबर म्हणजे दारू, मटन, गाणे थिरकने हा तरुण वर्गाचा आवडीचा कार्यक्रम. ३१ डिसेंबर म्हणजेच पार्टी अस समीकरनच झाले आहे. मात्र हिन्दू संकृतिमध्ये ही ३१ डिसेंबरची प्रथा तरुण वर्गाला त्यांच्या आयुष्याचा रस्ता भटकावून टाकू शकते. म्हणूनच दारू नको, दूध प्या…हा उपक्रम यावर्षी देखील करण्यात आला.

औंध येथील औंध कुस्ती केंद्र आणि श्री. वसुंधरा सेवा संस्था यांच्या वतीने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. कोविड १९ च्या परिस्थिति पाहता कार्यक्रमात सोशल डिस्टेंस आणि साधेपना कायम ठेवण्यात आला. कार्यक्रमात एकूण १२३ लीटर दुधाचे वाटप करण्यात आले. औंध परिहार चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी आवर्जून हजेरी लावली आणि शुभेच्छा देऊन दूध वाटपास हातभार लावला.

कार्यक्रमाला औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त जयदीप पवार, आनंदवन व्यसनमुक्ति व पुनर्वसन केन्द्राचेअध्यक्ष डॉ. अजय दूधाने, औंध नगरकार्यवाह विद्यासागर गुजर तसेच राष्ट्रीय कीर्तिचे बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देत प्रशंसा केली. 

सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, नामंकित वकील अनिल कांकरिया, डॉ प्रशांत चोधरी, राजेंद्र मुरकुटे, अनिल भिसे, सचिन भागवत सर्व माननीय उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजक औंध कुस्ती केंद्रचे अध्यक्ष वस्ताद विकास रानवडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. श्री वसुंधरा सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन वाडेकर यांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

 

See also  परिहार चौक औंध येथे काँग्रेस पक्षाचे शेतकरी विरोधी काळे कायदे व महागाई विरोधात आंदोलन.