पीएमपीएलच्या ऑइल गळतीमुळे बालाजी चौक सुस रोड येथे दुचाकी घसरून अपघात.

0
slider_4552

पाषाण :

पाषाण-सूस रोड रस्त्यावर पीएमीएमएलच्या बसमधून होणाऱ्या ऑईल गळती मुळे बारा तेरा दुचाकीस्वार घसरून पडले. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी पीएमपीएल ने नागरिकांना त्रास दिला. सुदैवाने दुचाकीवरून पडलेल्या ना जास्त दुखापत झाली नाही.

ही घटना सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला फोन केला. अग्निशामक दल आल्यावर त्यांच्या मदतीने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अशोक दळवी व सिकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी विश्वकर्मा सोसायटी ते वाकेश्वर मंदिर पुलापर्यंत ऑईल सांडलेल्या रस्त्यावर तत्काळ उपाययोजना करून माती टाकली.

या वेळी बालाजी रिक्षा स्टँड सभासदांनी व शौकत शेख यांनी खूप मेहनत घेतली. यामध्ये सचिन पाषाणकर आणि अशोक दळवी यांनी स्वतः या कामात सहभाग घेवुन संभाव्य धोका टाळला.

यावर प्रतिक्रीया देताना अशोक दळवी यांनी सांगीतले की, पीएमीएमएलच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पीएमपीमएल बसेस व्यवस्थित दुरुस्त कशा होतिल हे पाहायला हवे. तसेच नागरिकांनी देखील अशा घटना दिसताच त्यावर उपाय योजना केल्या तर संभाव्य धोके टळतील.

तसेच स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी सांगीतले, की ज्या पद्धतीने नागरिकांनी तत्परता दाखविली त्यामूळे पुढील धोका टळला असला, तरी पीएमीएमएलच्या ताफ्यातील बसेस कडे अधिकाऱ्यांनी वेळीच ऑईल गळती मुळे होणारे मोठे अपघात टाळावे म्हणून दक्ष राहायला हवे.

See also  बाणेर येथे दोनशे बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार : महापौर