परिहार चौक औंध येथे काँग्रेस पक्षाचे शेतकरी विरोधी काळे कायदे व महागाई विरोधात आंदोलन.

0
slider_4552

औंध :

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे परिहार चौक औंध पुणे याठिकाणी कृषी विधयक विरुद्ध व पेट्रोल,डिझेल, गॅस दरवाढी धरणे आंदोलन करण्यात आले व बोपोडी ब्लॉक काँग्रेस प्रभाग क्र ८ कार्यकर्त्याची बैठक अजिंक्य गार्डन मंगल कार्यालय गायकवाड नगर औंध पुणे येथे संपन्न झाली.

यावेळी रमेशदादा बागवे पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी विरोधी आणलेला काळा कायदा मागे घ्यावा, शेतकरी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे त्यांना दिला जाणारा त्रास थांबला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याकरता देशभर आंदोलने सुरू केली आहे. त्यामुळे सरकारने काळे कायदे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी केली.

अभय छाजेड यांनी यावेळी बोलताना सांगितले, कोणाशीही चर्चा न करता कोणालाही विचारात न घेता, काळे कायदे मंजूर करून सामान्य जनतेसाठी कोणतीही संवेदना मोदी सरकारमध्ये नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. मोदी सरकारच्या काळात देशाच्या आर्थिक व्यवस्था डबघाईला आली देशाचे झालेले मायनस 23% ग्रोथ रेट जगामध्ये कुठेही नाही.

मा. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी बोलताना म्हंटले की, मोदी सरकारने खाजगीकरण करून देश विकायला काढला आहे विविध कंपन्या आतापर्यंत खासगीकरण केल्यामुळे ते देशासाठी काय ठेवणार आहे, तसेच प्रभागात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असे ही गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक ८ कार्यकर्त्यांच्या  बैठकीत बोलताना सांगितले व पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोटनिवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी सूचना दिल्या.

मा. नगरसेवक शिवाजी बांगर यांनी बोलताना म्हंटले की हा प्रभाग हा काँग्रेस चा बालेकिल्ला होता. येथे भविष्य काळात नगरसेवक आणी आमदार काँग्रेस पक्षाचा असेल या साठी प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करू अशी ग्वाही दिली.

या वेळी अभय छाजेड सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, कैलास गायकवाड मा. नगरसेवक, शिवाजी बांगर मा. नगरसेवक, आदिती गायकवाड कडू पाटील सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस, स्नेहल बांगर सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस, राजेंद्र भुतडा अध्यक्ष बोपोडी ब्लॉक काँग्रेस, सुंदर ओव्हाळ अध्यक्ष बोपोडी ब्लॉक महिला, ॲड.नंदलाल धिवार मा. नगरसेवक, विठ्ठल आरुडे, रमेश पवळे सर, इंद्रजित भालेराव, मेनुद्दीन अत्तार, करीम तुर्क, जुबेर पिरजडे, साजीद शेख, मयुरेश गायकवाड, मनोज भिंगारे, प्रवीण चव्हाण, मदन मारुडा, शंकर गावडे, रवी मोहोळ, विजय जगताप, विशाल जाधव, रेखा जाधवर, ओम बांगर ,अनिल जाधवर, सुनील जाधवर, शोभा आरुडे, इंदुबाई गायकवाड, कमल गायकवाड, कांता ढोणे, अरुणा चिमटे आदि मान्यवर उपस्थित होते.

See also  स्वातंत्र्यदिनानिमित्त औंध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराचे उद्घाटन...!