कृषी कायदे मागे घेत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार : राकेश टिकैत

0

दिल्ली :

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत विविध सीमांवर आंदोलन सुरूच आहे. त्यात आता शेतकरी नेत्यांनी 6 फेब्रुवारीला चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. देशातील सर्वच राष्ट्रीय आणि राज्यांमधील महामार्ग चक्काजाम करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यांवर निर्णय घेण्यासाठी ऑक्टोंबरपर्यंत वेळ दिली असून, भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा ईशारा देखील दिला आहे. सरकारने कृषी कायद्यांवर विचार करून हे कायदे रद्द करावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘आम्ही केंद्र सरकारला ऑक्टोबर 2021 पर्यंतची वेळ दिली आहे.तो पर्यंत सरकारने विचार करून हे विधेयक रद्द करावे. अन्यथा आम्ही 40 लाख ट्रॅक्टर घेऊन देशरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करू. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार.’ असे राकेश टिकैत म्हणाले. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी आज राकेश टिकैत यांची गाझीपूर सीमेवर भेट घेतली. त्यावेळी राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत विविध सीमाभागांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनाचा आज 70 वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, जो पर्यंत नवीन कृषी कायदे रद्द केले जात नाही. तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आतापर्यंत 11 वेळा बैठकी झाल्या मात्र, त्यात कोणत्याही तोडगा निघालेला नाही.

6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी देशभरात ‘चक्काजाम’ आंदोलनाची हाक दिली असून, पोलीसांनी दिल्लीच्या सीमांवर सुरक्षा वाढवली आहे. आंदोलनस्थळी दिल्ली पोलीसांनी रस्त्यांवर धारदार खिळे आणि बॅरिकेट्सची भींत तयार करण्यात आली आहे. सोबतच इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी, दिल्ली पोलीसांनी आतापर्यंत 12 संशयित जणांचा फोटो जारी केला आहे. पोलीसांचं म्हणणं आहे की, या लोकांनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसा भडकवली होती.

See also  संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेकडे आंदोलनाच्या मुद्यावर लक्ष देण्याची मागणी : आंदोलक शेतकरी