संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेकडे आंदोलनाच्या मुद्यावर लक्ष देण्याची मागणी : आंदोलक शेतकरी

0

नवी दिल्ली :

दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी गेल्या ११२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेकडे या मुद्द्यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच आंदोलनात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असे वृत्त आहे.

अनेक वृत्तपत्रांनी याबाबत वृत्त दिल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले आहे. ”संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेकडे आंदोलनाच्या मुद्यावर लक्ष देण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या मुद्यावर हस्तक्षेप करावा, असेही म्हटले आहे,” असे वृत्तात म्हटले आहे.

केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बुधवारी (ता.१७) ११२ दिवस झाले. दिल्लीच्या विविध सीमांवर आजही हजारो शेतकरी बसलेले आहेत. आंदोलनस्थळी दररोज कृषी कायदे आणि केंद्र सरकारविरोधात शेतकरी निदर्शन करत घोषणाबाजी करत आहेत. तर कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये महापंचायतींचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, या महापंचायतींना हजारो शेतकरी उपस्थित राहून कृषी कायद्यांना आपला विरोध दर्शवित आहेत. तर पाच राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारांमध्ये शेतकरी कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत.

See also  संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा. प्रमुख 12 विरोधी पक्षांनचा पाठिंबा