पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले.

0

पुणे :

पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले. बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हाणून पाडला. यामध्ये  अभिनेते  रवींद्र मंकणी यांचे सुपुत्र रोहन मंकणी यांचाही समावेश आहे.

डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक करण्यात आली. भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. रवींद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या आहेत. तर निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

खातेदारांचे सव्वा दोनशे कोटी वाचले

काही बॅंकांच्या देशभरातील खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन या माहितीची विक्री करण्याचा मोठा डाव पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. या डेटा चोरी आणि विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले.

25 लाख स्वीकारताना 10 जण अटकेत

या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्वीकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत.

See also  मेट्रो प्रकल्पाच्या माण येथील कारशेडच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला.