ऑटोमोबाइल क्षेत्रात भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे- नितीन गडकरी

0

पुणे :

देशातील ऑटोमोबाइल क्षेत्राची अर्थव्यवस्था यापूर्वी सात लाख कोटींच्या घरात होती. त्यावेळी भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे ‘सीओईपी अभिमान पुरस्कारां’चे वितरण गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, नियामक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, मानद सचिव डॉ. सुजित परदेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते उपस्थित होते.

यंदा ‘सीओईपीजीवनगौरव पुरस्कार’ अहमदाबाद येथील ज्येष्ठ उद्योजक पी. एन. भगवती यांना देण्यात आला, भगवती यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील ‘जे. पी. मॉर्गन चेस’च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया, अमेरिकेतील ‘टेस्ला मोटर्स’चे वरिष्ठ संचालक हृषिकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना सीओईपी अभिमान पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

जगात ऑटोमोबाइल क्षेत्रात अमेरिका , चीन,) आणि भारत ,येथील अर्थव्यवस्था अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे. आपल्या देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) रूपाने देशाला आणि राज्याला सर्वाधिक कर प्राप्त करून देणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्राने साडेचार कोटी नागरिकांना रोजगार दिला आहे. येत्या पाच वर्षांत या क्षेत्राचा विस्तार दुप्पट होऊन अर्थव्यवस्था 55 लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट उद्योजकांना दिले आहे. लवकरच ऑटोमोबाइल क्षेत्रात आपण अमेरिकेलाही मागे टाकू,” असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

See also  नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी देशाची राजधानी ‘हाय अलर्ट’ वर, दिल्लीत ‘या’ गोष्टींवर बंदी