महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, फडणविस मंत्रिमंडळात नसणार!

0

मुंबई :

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली आहे तसेच नव्या सरकारमध्ये आपण नसणार मात्र सरकारचा चालवण्याची जबाबदारी आपली असल्याचेही म्हटले आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटासह सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. आज सायंकाळी ७.30 वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचले. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. तिथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर आज संध्याकाळी ७.30 वाजता भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

See also  राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी सुकाणू समितीचे गठण