लाडकी बहिणीचे पैसे 2100 रुपये करणार”;अजित पवारांचे लाड़क्या बहिणींना मोठे आश्वासन; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

0

मुंबई :

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिथ्द करत आहेत, त्यातच आज राष्ट्र्वादी कॉँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा लाडकी बहीण योजनेविषयी करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असे म्हटले गेले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले गेले आहे.

*मागच्या 4 महिन्यातील बदल जनतेसमोर सादर*

जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. ‘लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत.

स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरु केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणारआहे.

*अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे*

* लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार

* दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा

* 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा

See also  सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे