कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीसाठी नेत्यांच्या प्रचार सुरु झाल्या आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (दि. 5)कोल्हापूरच्या राधानगरी – भुदरगड मतदारसंघात सभा झाली. या सभेतून त्यांनी भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्राच्या हक्काचा एक कणही कुणाला देत नव्हतो. एवढा दरारा मी दिल्लीत निर्माण केला होता. यामुळेच त्यांनी आपले सरकार पाडले. पण आता त्यांना महाराष्ट्र विकायचा आहे. सर्वकाही गुजरातला न्यायचे आहे. गद्दारी करून सर्वकाही विकले जात आहे.
*उद्धव ठाकरेंची जनतेला 5 आश्वासने -*
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांना मोफत उच्च शिक्षणासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासंबंधीची 5 महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या तुलनेत ही आकश्वासने महाविकास आघाडीसाठी गेमर्चेजर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारकडून राज्यातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा व मुलगी हे दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे काळाची गरज आहे.
– पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना अनेकदा तक्रार कुठे करायची हेच कळत नाही. त्यामुळे मविआचे सरकार आल्यास राज्यात तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात विविध ठिकाणी पोलिस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारीकार्यरत असणारे विशेष पोलिस ठाणे सुरु केले जाईल.