अंतिम चेंडूवर षटकार खेचत बॉडी गेट संघाने मिळविले ए.बी.बी. चषकाचे विजेतेपद.

0

औंध :

डॉ. सागर गणपतराव बालवडकर व औंध क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डे नाईट (फुल पिच) क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभ औंध गाव येथील इंदिरा गांधी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाला.

यावेळी बोलताना ॲड. तानाजी चोंधे म्हणाले की, बालेवाडी मध्ये महिला आणि पुरुषांच्या फार सुंदर क्रिकेटची स्पर्धा घेतल्या नंतर औंधमध्ये देखील अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डॉ. सागर बालवडकर यांनी केले. तरुणांमध्ये असणाऱ्या उत्साहाला चालना देण्याचे काम त्यांनी केले. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. तसेच सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती कलापुरे यांनीदेखील डॉ. सागर बालवडकर यांनी केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. तसेच खेळाडू चांगले खेळले त्यांना शुभेच्छा दिल्या.

अतीशय चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यांत बॉडी गेट संघाने अंतिम चेंडूवर उतुंग षटकार खेचत अण्णा इलेव्हन संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये गेलेल्या संघाना आयोजक डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने टी-शर्ट देण्यात आले. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सात दिवस विद्युत प्रकाश ज्योतात खेळवण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्याकरता औंध क्रिकेट क्लब खूप मेहनत घेतली.

प्रथम क्रमांक : बॉडी गेट क्रिकेट क्लब
द्वितीय क्रमांक : अण्णा इलेव्हन क्रिकेट क्लब
तृतीय क्रमांक : झुंजार क्रिकेट क्लब
चतुर्थ क्रमांक : बंडू भोसले क्रिकेट क्लब
पाचवा क्रमांक : एफ रेसिडेन्सी बालेवाडी

मॅन ऑफ द सिरीज : सिद्धार्थ पिसाळ
बेस्ट बॅट्समन : शिवा कांबळे
बेस्ट बॉलर : लक्ष्मण अतकरे
फायनल मॅन ऑफ मॅच : लक्ष्मण अतकरे

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप, श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, ॲड. तानाजी चोंधे, कैलास गायकवाड, निवृत्ती कलापुरे, आनंद जूनवने, अजय निम्हण, विकास रानवडे,अविनाश कांबळे, विरेंद्र रानवडे, बाळासाहेब पवार, शिला भालेराव, प्रा रूपाली बालवडकर, प्राची सिद्दीकी, अंशुमाला सिंग, अक्षय मुरकुटे, प्रशांत सपकाळ, ज्ञानेश्र्वर जूनावणे, राहूल गायकवाड, सुनिल गुंजाळ, राहूल जूनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  औंध येथे 'काव्य अटल' उपक्रम उत्साहात संपन्न.