पाषाण टेकडीवरील जोडप्याला मारहाण करुन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलीसांनी केले जेरबंद

0

चतुःश्रृंगी :

दिनांक १८/३/२०२२ रोजी सांयकाळी पाषाण टेकडी येथे फिर्यादी व त्यांची मैत्रिण हे फिरायला गेले असताना रात्रौ ०८.१५ वा चे सुमारास ते फिरुन टेकडीवर एके ठिकाणी बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना सदर ठिकाणी येवुन हाताने व लाथा-बुक्यांनी मारहाण, दमदाटी करुन, फिर्यादी व साक्षीदार यांना ठार मारण्याची धमकी देवून, त्यांच्या बँक खात्यातून फोन-पे च्या माध्यमातून रक्कम रुपये ७६,०००/- रुपये जबदस्तीने ट्रान्स्फर करुन जबरी चोरी केली. त्यावरुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र नं.९६/२०२२ भादंवि कलम ३९४, ३९२, ४२७.३४ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार परिमंडळ-४ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग, पुणे शहर यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांनी केलेल्या सुचनेनुसार तपास पथकाचे अधिकारी व सर्व स्टाफ यांनी वेग-वेगळया टिम तयार करून, कसोशिने तपास करता, गोपनिय बातमीदारा कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १)गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण, वय- २७ वर्षे, धंदा-मिस्तरी, रा. मराठी शाळेजवळ, पवन चक्की जवळ, लोणीकंद, ता.हवेली जिल्हा पुणे, मुळ पत्ता-डोंगर तळा, ता. जिंतुर, जिल्हा परभणी २)राजु मंजुनाथ जगताप, वय-२५ वर्षे, धंदा-मिस्तरी काम, रा. महादेव मंदीराजवळ, नसरापुर, ता. हवेली, जिल्हा – पुणे. मुळ गांव-बिरुर, ता.कडोर, जिल्हा-चिपमगळुर, राज्या कर्नाटक यांनी केल्याचे तपासांत निष्पन्न झाले.

त्यावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे, पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड, सपोनि संतोष कोळी, तपास पथक अधिकारी मोहनदास जाधव व तपास पथकातील कर्मचारी यांनी गुन्हयातील मुख्य आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपास केला असता, त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे, जालना, नाशिक, पुणे ग्रामिण, अहमदनगर, येथील वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरीचे असे एकुण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असुन पुढील तपास सुरु आहे.

See also  बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने वसंत पंचमी सोहळा उत्साहात पार...

पुणे शहरालगत असणारे टेकडीवर फिरायला जाणारे नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे
पोलिसांनी केले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त,परी-४,पुणे शहर रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड, सपोनि संतोष कोळी, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार सुधाकर माने, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, दिनेश गडाकुंश, तेजस चोपडे, मुकुंद तारू, इरफान मोमीन, भाऊराव वारे, बाबा दांगडे, बाबुलाल तांदळे यांनी केली आहे.