महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राथान्य-चंद्रकांत मोकाटे

0

कोथरूड :

कोथरूडमधील महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी सोडविण्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

विशेषतः महिलांच्या सुरक्षेतेला महत्व देत,कोथरूडचे वातावरण महिलांसाठी सुरक्षित राहील,याकडे लक्ष असेल असे मत कोथरूड विथानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केले.

मोकाटे हे भाऊबीजेला कर्वेनगर येथील विठ्ल-रुक्मिणी मंदिर, किष्किंधानगर, सुतारदरा यासह अन्य ठिकाणी मंदिरात काकड आरती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करत “भाऊ म्हणून नेहमी पाठीशी राहा आणी महिलांसाठी कोथरूड सुरक्षित व्हावे’ अशी मागणीमांडली.

त्यावेळी भावूक झालेले मोकाटे म्हणाले, “महिला अत्याचार रोखण्यासाठी कड़क पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. केवळ कोथरूड नव्हे, तर पु्णे शहरात याबाबत जनजागृती करणार आहे. विविध ठिकाणी महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्लागार संपर्क कार्यालय सुरू करणार. महाविद्यालये आणी शाळांमध्ये चौकशी समिती स्थापन करून दरमहा त्याची बैठक घेणार आहे.’

 *स्वच्छता महत्त्वाची…*

पदयात्रेद्वारे नागरिकांच्या गाठीभेटी सुरू असताना सागर कॉलनीत ओढ्यालगत साचलेला कचरा, अस्वच्छता यामुळे चंद्रकांत मोकाटे यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी रहिवाशी वैशाली कोळेकर,धनश्री बागडे, जनाबाई ठोंबरे, शांताबाई बढेकर आदी महिलांनी समस्या मांडताच मोकारटेंनी महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, मुकादम आणि कर्मचाऱ्याना बोलावून घेतले आणि तत्काळ स्वच्छता करण्यास सांगितले. त्यानुसार काम सुरू झाले. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी वेळच्यावेळी स्वच्छता व्हावी, असेही मोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी मोकाटे यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

See also  बालेवाडी येथे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर