औंध येथे महाविद्यालयाचे प्राचार्य यांची आत्महत्या !

0

पुणे :

पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य यांनी पुण्यातील औंध भागात तिसऱ्या मजल्यावरून उडीमारून एका निवृत्त प्राचार्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

गजनान वैजनाथ परिशवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या निवृत्त प्राचार्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजनान हे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते निवृत्त झाले होते. सध्या ते औंध येथील नागनाथ रोडवर असणाऱ्या हर्ष पॅराडाईज इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होते.

त्यांची दोन मुले स्वीडन आणि जर्मनी येथे परदेशात असतात. गजनान यांनी सोमवारी रात्री तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. चतुःश्रुगी पोलोसानी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आत्महत्या स्थळी कोणतीही चिठ्ठी न मिळाल्याने आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही असे पोलिसांकडून समजते.

 

See also  बोपोडी -खडकी येथील वाहतूक समस्या लवकरच सुटेल : आमदार सिद्धार्थ शिरोळे