बाणेर येथिल नगरसेवकाच्या हत्येची सुपारी..

0

पुणे :

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव चांदेरे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचं नाव आहे. बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. या प्रकरणाविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून ही सुपारी नेमकी कोणी दिली याचाही पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. हाती मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा समीर याने या प्रकरणासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून असल्याचं चांदेरे यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तपास काढला असला त्यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ त्यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला सराईत गुन्हेगार अनिल यशवंते आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजही मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत असून सुपारी नेमकी कोणी दिली याचा शोध सध्या सुरू आहे.

See also  लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने फर्स्ट एड पॉलि-क्लिनिक नागरिकांच्या सेवेसाठी सुरू.