बालेवाडी :
लहु बालवडकर सोशल वेलफेअर आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुगे येथील नागरीकांसाठी अल्प दरात उत्तम आरोग्य सेवा…फर्स्ट एड पॉलि-क्लिनिक उद्घाटन समारंभ तसेच प्राणी मित्र, गॅस सिलेंडट कर्मचारी व वृत्तपत्र वितरक यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यानिमित्त यांचा सन्मान भाजपा प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वसामान्य माणसांसाठी आवश्यक असणारे वीस रुपयांमध्ये ओपीडी असा अतिशय चांगला उपक्रम लहू बालवडकर सुरू करत आहेत. आम्ही केलेला आव्हानाला त्वरित प्रतिसाद देत जनसामान्यांच्या हितासाठी फर्स्ट एड पॉलि-क्लिनिक सूरू केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाने थैमान घातल्यानंतर महा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळणे फार महत्त्वाचे आहे. असे महत्त्वाचे काम लहू बालवडकर यांनी आज केले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना जमेल तसा रोजगार मिळवून देण्याचेही काम करावे असे आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बोलताना लहू बालवडकर यांनी सांगितले की डॉक्टर डेच्या निमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आव्हानाची प्रेरणा घेवून लहु बालवडकर सोशल वेलफेअर आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने फर्स्ट एड पॉलि-क्लिनिक सूरू केले आहे. या चांगल्या कामासाठी मदत झालेल्या डॉक्टरांची व जागा उपलब्ध करून देणारे पाटील यांचे त्यांनी आभार मानले. सुस व म्हाळुंगे या भागात देखिल भविष्यात असे प्रथमोपचार आरोग्य केंद्र सुरु केले जातील असे आश्वासन दिले. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी आव्हान केले.
या कार्यक्रमास डॉ. सचिन गांधी, सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. रोहित बोरकर, डॉ. राजेन्द्र जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे शहर युवक अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा सरकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, नितीन रनवरे, कोथरूड महिला अध्यक्षा उमा गाडगीळ, स्वरूपा शिर्के, सुसगाव सरपंच अपूर्वा निकाळजे, विद्या बालवडकर, महिला आघाडी तसेच भाजपा चे सर्व पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते.