प्रसिद्ध कार डिझायनर छाब्रिया यांना अटक !

0

मुंबई :

देशातील सुप्रसिद्ध कार डिझायनर असलेले डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून एक शानदार स्पोर्ट कार सुद्धा मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे.

डीसी असा लोगो एखाद्या कारवर असला म्हणजे त्या कारला दिलीप छाब्रिया यांचा स्पर्श झाला म्हणून समजा. डीसी या नावानेच त्यांना ओळख प्राप्त झाली. पण, सोमवारी त्यांच्याच व्यवसायाशी संबंधीत प्रकरणातून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी दिलीप छाब्रिया यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक शानदार स्पोर्ट्स कार जप्त केली आहे. त्यांच्याविरोधात कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांना अटक का आणि कशासाठी करण्यात आली, याबद्दल मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे.

दिलीप छाब्रिया यांनी एक शानदार स्पोर्ट्स कार तयार केली आहे. या कारचे मालक इंदरमल रमानी आहे. तामिळनाडूतील आरटीओ कार्यालयात त्यांच्या नावाने कार रजिस्टर करण्यात आले आहे. छाब्रिया यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हाच्या कटात सहभागी असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणामध्ये आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामागे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रॅकेट बेकायदेशीररित्या कारचे रजिस्ट्रेशन करत असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

See also  आमदार रवी राणा यांना अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करावी : मुंबई उच्च न्यायालय