“सर्व सामान्यांसाठी योगीराज पतसंस्थेचे मोठे योगदान ” : माजी आमदार विजय काळे

0

औंध :

योगीराज पतसंस्था ही सर्व सामान्यांसाठी कायम मदत करत असते, असे प्रतिपादन योगीराज पतसंस्थेच्या कैलेंडर प्रकाशनाच्या वेळी माजी आमदार विजय काळे यांनी केले. संस्थेच्या संचालकांचा संस्थेबाबत असलेला प्रामाणिकपणा व योग्य नियोजन यामूळेच संस्था प्रगतीपथावर आहे. तसेच संस्थेने पुढील काळात महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करावे अशी सुचना याप्रसंगी त्यांनी केली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतिचा आलेख तसेच संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती सादर केली. संस्था प्रत्येक वर्षी कैलेंडरवर चित्रांच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणा व माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. “भारतरत्न पुरस्कार” मिळालेल्या देशातील विविध नामांकीत व्यक्तींचे फोटो व माहिती यावर्षी संस्थने कैलेंडरवर छापली आहे अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.

राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी सांगितले की, संस्था चालू वर्षी रौप्य महोत्सवी सोहळा साजरा करणार आहे. यामध्ये विविध सामजिक कार्यक्रमा बरोबर अखिल भारतीय वारकरी संगीत सम्मेलन आयोजीत करणार आहे.

याप्रसंगी दिपाली भालेराव, म.न.से. चे प्रदेश उपाध्यक्ष गणपत महाले, पंडीत यादवराज फड, ह.भ.प. संजय बालवडकर, नितीन कोलते, विनायक शिंदे, संस्थेचे संचालक अशोक रानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके तसेच कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे संचालक तथा नियोजन समिती अध्यक्ष राजेश विधाते यांनी केले. तसेच संस्थेच्या संचालिका रंजना कोलते यांनी आभार मानले.

See also  मुळा नदीवर जलपर्णी न काढल्यास आंदोलन करणार : अदिती गायकवाड कडू पाटील