गॅस दरवाढ विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन.

0

पुणे :

केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. महिलांनी पुण्यातील मंडई येथे चुल पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वात निषेध नोंदविला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

गिरीष बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवाढ कमी करावी असे सांगावे” अशी मागणी वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलक महिलांनी केली आहे. पुण्यातील विविध भागात हे आंदोलन केले. महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले.

मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे.

दरवाढीने महिलांना भगिणीचं आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाहीये. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलनं करत आहोत मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा ही यावेळी आंदोलक महिलांकडून देण्यात आला आहे.

 

See also  नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने 'पावर्ड एअर प्युरीफयिंग रेस्पिरातर' मशीनचे वाटप