अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार !

0

राळेगण सिद्धी :

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी परवानगी मागितली असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंदोलन करणार आहेत. टीव्ही मराठीने हे वृत्त दिले आहे.

अण्णांचे आंदोलन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असणार आहे. अण्णा हजारे यांनी आपले शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं होतं. कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना अण्णा हजारे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे, गिरीश महाजन यांनी अण्णांची भेटही घेतली होती.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते.

See also  राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार : शिक्षणमंत्री