कोरोनापेक्षाही अधिक घातक संसर्गजन्य आजार येण्याची शक्यता : WHO

0

देशासह जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवून दिला आहे. या विषाणूमुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावावे लागले, तर अनेक आजही मृत्यूशी झुंज देत आहेत. अशातच WHO ने जगावर कोरोनापेक्षाही घातक आजाराचे संकट ओढावणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. यावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी इशारा दिला की, कोरोनापेक्षाही घातक आजार जगभरात फैलवणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या १९४ सदस्य देशांतील आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. दरम्यान कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका काही थांबणार नाही असेही प्रतिपादन त्यांनी केले.

जगभरात कोरोना विषाणूसह त्यांचे अनेक नवनवीन व्हेरियंट वेगाने पसरत असल्याने कोणत्याही खबरदारीच्या नियमांमध्ये शिथिलता आणणे सध्याच्या घडीला धोकादायक ठरु शकते. तसेच जग सध्या अखेरच्या महासाथीच्या आजाराशी मुकाबला करत नसून कोरोनापेक्षाही अधिक घातक संसर्गजन्य आजार येत्या काही काळात फैलावण्याचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान अनेक देशांच्या लसीकरण साठवणूकवरही टेड्रोस यांनी ताशेरे ओढले. यावर बोलताना टेड्रोस म्हणाल्या, लशीच्या वितरणावरून जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. यात जगातील एकूण ७५ टक्के कोरोना लस फक्त १० देशांनाच मिळाली आहे. त्यामुळे गरीब देशांतील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी भविष्यकालीन नवीन योजना आखली जाईल. तसेच लसीचा साठा करुन ठेवणाऱ्या देशांनी गरीब देशांना लस पुरवावी असे आवाहनही WHO ने केले आहे.

See also  भारतास उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच स्वप्न : राजनाथ सिंह