भारतास उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच स्वप्न : राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली :

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी बेंगळुर मध्ये हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या दुसऱ्या निर्मीतीच्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट केंद्राचे उदघाटन केले. उद्यापासून एअर इंडीया शो होणार आहे. या शो मध्ये अमेरिकेचा एअरक्राफ्टच ही प्रर्दशन होणार आहे. पहील्यांदाच अमेरिकेचे लढाऊ विमान भारतात होत असलेल्या एअर इंडीया शो मध्ये सहभाग घेणार आहे. व त्याची तयारी आधीपासुन करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर भारत बनवण्याची संकल्पना पुर्ण झाली आहे. आता उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच स्वप्न आहे. या उद्देशाने भारत सरकार अत्यंत गंभीर असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळेस सांगितले.तेजस केवळ स्वदेशीच नाही तर अनेक मापदंडांवर असलेल्या त्याच्या पातळीवरील परदेशी लढाऊ विमानांपेक्षा बर्‍यापैकी श्रेष्ठ आहे. या मानकांमध्ये इंजिनची क्षमता, रडार यंत्रणा तसेच किंमतीचा समावेश असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

संरक्षणमंत्री म्हणाले, “देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही अन्य देशांवर किती काळ अवलंबून राहू, आम्ही जास्त काळ अवलंबून राहू शकत नाही.” भारताचा हा संकल्प आहे की आपल्याला जे काही बनवायचे आहे ते आपण स्वतः बनवण्याचा प्रयत्न करतो आणि सीमेचे आणि आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करतो, मला कळविण्यात आले आहे की तेजस एमवनए मध्ये विविध देशांनी रस दाखवला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हमी देतो की लवकरच इतर देशांकडून ऑर्डर प्राप्त होतील “, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

दिल्लीहून बेंगळुरूला रवाना होण्यापूर्वी त्यांनी म्हटले की, “आज एचएएलच्या दुसर्‍या एलसीए प्रॉडक्शन लाईनच्या उद्घाटनासाठी बेंगळुरूला जात आहे. आणि 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एअरो इंडिया शो मध्ये सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात कोरोना असुनही लोकांचा सहभाग उत्साह आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. यात बैठकीत सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण कराराला मान्यता देण्यात आली होती. हा करार 48 हजार कोटींचा आहे, त्याअंतर्गत 83 एलसीए तेजस लढाऊ विमान विकसित केले जाणार आहेत

See also  धक्कादायक ! जंगलाचा राजा सिंह देखील कोरोना पॉझिटिव्ह.