धक्कादायक ! जंगलाचा राजा सिंह देखील कोरोना पॉझिटिव्ह.

0

हैदराबाद :

आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून प्राणी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर जंगलाचा राजा सिंह देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

हैदराबादच्या नेहरू जूलॉजिकल पार्क (NZP) येथे तब्बल आठ सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. भारतात पहिल्यांदाच मानवापासून प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणाची ही पहिली घटना घडली आहे. या आठ सिंहांपैकी चार मादी असल्याचं आढळलं आहे.

त्यांची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट घेतल्यानंतर असे आढळले आहे की, या आठ सिंहांना कोरोना विषाणूच्या जुन्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. 19 एप्रिल रोजी सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CCMB) ने तपासणीसाठी पाठविले गेले. यानंतर हे आठही सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नेहरू जूलॉजिकल पार्कचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, या सर्व सिंहांना श्वास घेताना त्रास होत असल्याचे आम्हाला आढळून आले आणि ते अधिक प्रमाणात शिंकत होते. त्यानंतर सर्वप्रथम सिंहांना भूल दिली त्यानंतर त्यांनी त्याच्या नाक, घसा आणि श्वसनमार्गामधून लाळ घेतली.

रिपोर्ट आल्यानंतर या आठ सिंहांना कोरोना झाल्याचे समोर आले. परंतु चिंता कारण्यासारखं नसून त्यांच्या शरीरात कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरियंट आढळलेला नाहीये. या सिंहाना खान्यामार्फत औषधे चालू असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मार्गदर्शक सूचनानुसार त्यांच्यावर उपचार सुरु असून लवकरच ते बरे होण्याची ग्वाही संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी दिली.

See also  कोरोनापेक्षाही अधिक घातक संसर्गजन्य आजार येण्याची शक्यता : WHO