भारताचा बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग पाचवे पदक पक्के

0

भारताचा अनुभवी बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग पाचवे पदक पक्के केले आहे. ६४ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थापाने कुवेतच्या नाडेर ओदाहचा ५-० असा सहज पराभव केला. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे त्याला किमान रौप्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. थापाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आक्रमक खेळ केला. त्याच्या जोरदार हल्ल्यापुढे ओदाहची डाळ शिजली नाही. त्यामुळे त्याने उपांत्य फेरी गाठली असून या फेरीत त्याचा सामना गतविजेत्या आणि अव्वल सीडेड बाखोदूर उस्मानोव्हशी होईल. उस्मानोव्हने उपांत्यपूर्व फेरीत जॉन पॉल पानूयनचा पराभव केला.

थापाची दमदार कामगिरी

थापाने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने २०१३ मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१५ आणि २०१९ मध्ये त्याला कांस्य, तर २०१७ मध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. आता त्याने उपांत्य फेरी गाठल्याने त्याचे किमान कांस्यपदक पक्के आहे. थापा या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी बॉक्सर आहे.

५-० अशी मारली बाजी

उपांत्यपूर्व फेरीत थापाने उत्कृष्ट खेळ केला. नाडेर ओदाह त्याला फारशी झुंज देऊ शकला नाही. थापाने या सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित करत ५-० अशी बाजी मारली. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारताच्या मोहम्मदहुसामुद्दीनचे मात्र या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यालाउझबेकिस्तानच्या विश्वविजेत्या मिराझीझबेक मिर्झाहालीलोव्हने १-४ असे पराभूत केले.

See also  न्यूझीलंडच्या संघाचा टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकत नवा विक्रम