संकटकाळात सर्व जगाची मदत करणाऱ्या भारताला कोरोना संकट काळात मदत करणे सर्वांचे कर्तव्य : प्रिन्स चार्ल्स

0

लंडन :

भारताने संकटकाळात सर्व जगाची मदत केली आहे. त्यामुळे आता कोरोनाचे संकट आले असताना त्याची मदत करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन करत प्रिन्स चार्ल्स यांनी भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांच्या मदतीने ब्रिटीश अशियन ट्रस्टच्या वतीने भारतातील कोरोनावर संकटावर तातडीने मदत करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचा प्रारंभ करताना प्रिन्स चार्ल्स बोलत होते.

ब्रिटीश राजघराण्याचे वारस असलेल्या प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या अनेक भारतभेटींची आठवण करताना म्हटले आहे की मला भारताबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आता भारत भीषण महामारीचा सामना करत असताना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे.

गेल्या वर्षीभरापासून आपण कोरोना महामारीचे भीषण रुप पाहत आहोत. परंतु, गेल्या आठवड्यापासून भारतातील महामारीचे चित्र पाहून मी व्यथित झाले आहे. त्यामुळे आपल्यातील सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

भारताने कोरोनाच्या संकटात जगातील बहुतेक देशांना विविध प्रकारे मदत केली होती. भारतीय मदतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेशी सामना करणे शक्य झाले होते. त्यामुळे आता या मदतीची परतफेड करणे आपले कर्तव्य आहे,असेही त्यांनी सांगितले. ऑक्सिजन फॉर इंडिया या मोहीमेचे त्यांनी उद्घाटनही केले.

See also  भारतात प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी नसल्याचा निष्कर्ष