15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम : अमिताभ गुप्ता

0

पुणे:

पुण्यातील कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुण्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास काढावा लागणार आहे. आतापर्यंत 9 हजार ई-पास देण्यात आल्या आहेत. नितांत गरज असेल तरच प्रवास करा. अथवा घरातच राहा, असं ट्विट गुप्ता यांनी केलं आहे.

See also  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस