भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

0
slider_4552

पुणे :

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी आज पुणे येथील संजीवन हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस घेण्यामध्ये कुठलीही भीती बाळगू नये. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. पण भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोनापासून आपणास संरक्षण मिळणार आहे.

लसीसाठी ज्या व्यक्ती पात्र आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने ही लस घ्यावी. स्वदेशी बनावटीची ही लस परिणामकारक आहे. भारताने आपली कोरोना प्रतिबंधक लस अनेक देशांना मोफत देऊन जगामधील कोरोना विरोधाच्या लढ्यात एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपापली कामे करताना आपली व कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

See also  पीएमआरडी अधिकाऱ्यांसमोर सुस ग्रामस्थांनी मांडल्या आराखड्यातील हरकती..!