धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वकिलांना अखेर एम्सचा आधार….

0

औंध :

प्रचंड प्रमाणात वाढत असलेला कोविडचा प्रादुर्भाव बाधित झालं तर ना हॅास्पिटलमध्ये जागा, ऑक्सिजन बेडचा तुटवडा व औषधांची अनुपलब्धता. घरादारापासून क्वारंटाईन होण्याची भीती. त्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयात कोरोनाचे थैमान. काम करायला जावे तर बाधित होण्याचा धोका, न जावे तर पक्षकारांचा रोष. त्यात दोन वकील व काहींचे कुटुंबीय संक्रमित झालेले. अशी काहीशी बिकट परिस्थिती धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वकिलांची झाली होती.

माजी महापौर दत्तात्रय गायकवाड काही कामासाठी धर्मादाय कार्यालयात गेले असताना तेथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने ही व्यथा त्यांचे समोर मांडली. तेंव्हा तातडीने त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून औंधच्या एम्स हॅास्पिटलचे एच आर ॲडमिन अनिरूध्द सप्रे यांचेशी चर्चा करून शुक्रवारी स्पेशल ड्राईव्ह आयोजित करून सुमारे तीस वकिलांचे लसीकरण केले.

या कामी एम्स हॅास्पिटल येथील व्हॅक्सिनेटर सिस्टर यांनी सर्वांना लस देऊन हा स्पेशल ड्राईव्ह पार पाडला. सप्रे यांनी लसीकरणानंतर घ्यायची काळजी समजावून सांगितली. विधिज्ञ ॲड. ओजस देवळणकर यांनी वकिलांचे वतीने कृतज्ञता व्यक्त केली. संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांनी आभार मानले.

या वेळी ॲड. शिवराज कदम जहागिरदार (विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे) यांनी सांगीतले की, वकील हा न्यायदानाच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक. त्यांचा संपर्क पक्षकार, कार्यालयीन कर्मचारी व न्यायिक कामाशी संबंधित लोकांशी सातत्याने येत असतो. अशावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचे पुढाकाराने व एम्स हॅास्पिटलने सर्वांचे लसीकरण करून एक प्रकारे मोठे सहकार्य केले असंच म्हणावे लागेल.

यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, वकील हा न्यायदान प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करणे गरजेचे होते. म्हणूनच तत्काळ निर्णय घेवुन एम्स हॉस्पिटल च्या सहकार्याने वकिलांचे लसीकरण करुन घेतले. आतापर्यंत जवळ पास १०,००० नागरीकांना लसीकरण केले गेले आहे. लस उपलब्ध नसल्याने आज शनिवारी लसीकरण होवू शकले नाही परंतू लस उपलब्ध झाली की परत लसीकरण सूरू होईल. लस सुरक्षित असल्याने नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी. नागरिकांनी येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा असेही यावेळी माजी महापौर गायकवाड यांनी सांगितले.

See also  स्वातंत्र्यदिनानिमित्त औंध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराचे उद्घाटन...!