लॉकडाउनच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात आंदोलन

0

सातारा:

शासनाकडून शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सातारा शहरासोबतच जिल्ह्यात पण लॉकडाऊन करण्यात आले आहे.यावेळी या लॉकडाउनच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांनी आंदोलन केले आहे.त्यांनी पवई नका येथे पोत्यावर बसून भीक मांगो आंदोलन केले आहे. ते ज्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नव्हते.

त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी यांना कॉल केले तेव्हा कोणीही तिथे हजर नव्हते.तेव्हा त्या ठिकाणी तहसीलदार आले.उदयन राजेंनी यावेळी जमा झालेली रक्कम तहसीलदारांच्या हाती सुपूर्द केली. लॉकडाऊन मुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत त्यामुळे लॉकडाऊन करू नये असे त्यांनी सांगितले.

 

See also  संजय राऊत यांच्या पत्नीस ईडीची नोटीस ?