लाॅकडॉऊन शिवाय दुसरा पर्याय नाही : मुख्यमंत्री

0

मुंबई :

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून अध्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली सर्वपक्षीय बैठक तब्बल अडीच तास चालली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने लॉकडाऊनवर एकमत व्यक्त केले आहे. उद्या (ता.१०) लॉकडाऊनवर अंतिम निर्णय टास्क फोर्सशी बैठक झाल्यानंतर घेण्यात येणार आहे.

See also  अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे 'राष्ट्रवादी'चे प्रयत्न - भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र