कोव्हिड योद्ध्यांप्रती ऋण व्यक्त करणं ही जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

0

कोराना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. त्यांच्या कामामुळेच आपल्या देशात एकही भूकबळी झाला नाही. त्यांच्या कामाबद्दल ऋण व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्थानिक नगरसेवक जयंत भावे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांना समर्पित सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, “कोरोना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. अनेकांनी महिनोन्महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करणं, ऋण व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.”

ते पुढे म्हणाले की, “कोरोनाच्या नऊ महिन्यांच्या काळात १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आर्थिक कोंडीनंतरही एकही भूकबळी झाला नाही. ज्या वेळी आवश्यक होतं, त्यावेळी समाजातील अनेकांनी भरभरुन मदत केली. या काळात कोव्हिड योद्ध्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार, बॅंकिंग क्षेत्रातील कर्मचारी या सर्वांमुळे समाजाचं अर्थचक्र सुरू राहिलं. त्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो.”

यावेळी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करत उपक्रमात सहभागी सर्व सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. तसेच काही कोरोना योद्ध्यांचा सरकार देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, पुणे भाजपा सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शहर चिटणीस प्रशांत आसोले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, महिला व बालकल्याणच्या सभापती माधुरी ताई सहस्त्रबुद्धे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कोथरूड भाजपा महिला मोर्चाच्या हर्षदा फरांदे, कोथरूड मंडलाच्या चिटणीस अनुराधा ऐडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, रामदास गावडे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस प्राची बघाटे यांच्यासह प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  सुसगावातील युवकांनी रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी !