कोथरूड :
अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या कोथरूड नाट्यमहोत्सव सलग तीन दिवस उत्साहात पार पडला. या नाट्यमहोत्सवाला कोथरूड मधील रसिकांनी चांगली दाद देऊन तिने दिवस कोथरूड येथील यशवंतराव नाट्यगृहाला हाऊसफुल्ल गर्दी केली.
या नाट्यमहोत्सवाची सुरुवात एका लग्नाची पुढची गोष्ट” या धमाल नाटकाने करण्यात आली. या नाटकातील मुख्य कलाकार प्रशांत दामले यांनी सांगितले की, नाट्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून आपल्या परंपरेला उभारी देण्याचे खूप महत्त्वाचे काम आजची तरुण पिढी करत आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
दुसऱ्या दिवशी जर तरची गोष्ट” हे सुपरहिट नाटक सादर झाले. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासह इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाने यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. तर तिसऱ्या दिवशी नियम व अटी लागू हे प्रसिद्ध नाटक प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले.
या नाट्यमहोत्सवाबद्दल बोलताना आयोजक माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, कोथरूड पुण्याची संस्कृतीची राजधानी आहे. या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात केले जातात. मला हा नाट्य महोत्सव या ठिकाणी आयोजन करण्याची संधी या रसिकांनी दिली, व त्याला दादही चांगली मिळाली आहे. असेच संस्कृती कार्यक्रम कोथरूड करांसाठी सतत राबवत राहू.