दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांचे सुसरोड येथे बेमुदत ठिय्या आंदोलन….

0

पाषाण प्रतिनिधी :

नविन कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उपशहरसंघटक आशुतोष आमले साईचौक, सुसरोड,पाषाण येथे रस्त्यावर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.

या आंदोलनात पाषाण,सुतारवाडी, सोमेश्वरवाडी,बाणेर,बालेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी उपविभागप्रमुख दिनेश नाथ , प्रभागप्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, शाखाप्रमुख अजिंक्य सुतार, गणेश दळवी, अक्षय गंगापुरे उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका संगिताताई पवळे, तालुका संघटिका ज्योती चांदेरे , शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ , सुमनताई जोरी, किसनभाऊ सुतार , युवासेनेचे प्रतिकदादा चांदेरे, कोथरूड मतदार संघ उपविभाग प्रमुख शामराव बालवडकर,विभाग समन्वयक मकरंद कळमकर, शाखाप्रमुख विक्रांत भोसले आदी उपस्थित होते…

महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.नगरसेवक प्रमोद निम्हण , व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणेशहर सरचिटणीस समिर उत्तरकर यांनी उपस्थित राहुन पाठिंबा जाहीर केला. संध्याकाळी काँग्रेस कमीटी पुणे शहर अनुसुचित जाती उपाध्यक्ष संभाजीराव नेटके, कोथरूड ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष दत्ताशेठ जाधव पाटील यांनी भेट देऊन या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणुन पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी चे युवानेते शैलैशभाऊ निम्हण यानीही प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनात आम्ही आपल्या सोबत आहोत असे जाहीर केले. त्यावेळी राष्ट्रवादी प्रभागअध्यक्ष आमोल फाले, तसेच पैलवान सुरेश कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते जाधव साहेब उपस्थित होते.

ठिय्या आंदोलनाला बसलेले शिवसेना उपशहरसंघटक आशुतोष आमले यांनी पाठिंब्या बाबत सर्वांचे आभार मानत असतानाच दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर होत असलेले हल्ले अत्याचार याचा निषेध व्यक्त केला. त्यांच्या संघर्षाला साथदेण्याठी तसेच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा कायदा असे गुणगान करून मोदी सरकार जो कायदा आणलाय तो येत्या कळात शेतकऱ्यांची अडचण निर्माण करणारा असुन त्या पुढील काळात सामान्य शहरी माणसाच्या बजेटवर परीणाम कारक ठरणार आहे. म्हणून त्याचा विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर तंबु ठोकून हे बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत अशी भुमिका मांडली.

See also  समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर  प्रयत्नशील.