समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर  प्रयत्नशील.

0

बालेवाडी :
नवीन समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी तरतूद उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन  केली आहे. गावे समाविष्ट झाली म्हणजे विकास झाला असं नाही. यासाठी आवश्यक असलेली तरतूद महापालिकेकडून मिळावी यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे  अमोल बालवडकर यांनी सांगितले.

नुकत्याच पुणे महानगरपालिकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सुस व म्हाळुंगे हा भाग विकसनशील आहे, तसेच याभागातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच या भागातील अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. हा भाग गेली अनेक वर्षांपासून महानगरालगत असून देखील पायाभूत मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईनचा अभाव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हि गावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्याने या गावांना पुणे म.न.पा.च्या अथवा महानगरामधील इतर सोयी सुविधांचा तितकासा लाभ मिळाला नाही.

  तरी या नव्याने पुणे म.न.पा.मध्ये समाविष्ट झालेल्या सुस व महाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविणे, ड्रेनेज लाईन या पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या गावांसाठी विशेष तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केली.

महापालिका आयुक्तांनी त्यांची हि मागणी मान्य देखील केली असून येत्या अर्थसंकल्पीय तरतूद २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात या नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष तरतूद दिली जाईल असे, आश्वासन दिले असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

See also  पाषाण सुतारवाडी येथील योग भवन येथे लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन