सुसगावातील युवकांनी रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी !

0

सुसगाव :

कोरोना व्हायरस च्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. कोरोना वाढते प्रमाण आणि धोका लक्षात घेवून राज्यसरकारने नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनिकेत उत्तम चांदेरे मित्र परिवार तर्फे सुसगाव येथे दि. १/५/२०२१ रोजी ससून रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

यावेळी नागरिकांनी व युवकांनी मोठा प्रतिसाद या शिबिरास दिला. सुस गावातील जवळपास ५१ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे शिबिरात सहभाग घेवुन रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.रक्तदानामुळे हजारो लोकांना जीवनदान मिळत आहे. कोरोनाच्या संकटसमयी प्रसंगी सामाजिक भान जपत रक्तदानासाठी सुस गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सहभाग नोंदवला.

See also  कर्नाटक येथे अपघातात जखमी गुणवान खेळाडूंना दया मदतीचा हात : माजी खेळाडूंचे आव्हान