लसीकरण केंद्र वाढले पण लस कुठे आहे, नागरीकांचा लस केंद्रावर सवाल… 

0

पाषाण :

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरामध्ये अनेक ठिकाणी लस केंद्र उभारण्यासाठी राजकीय चढाओढ पाहायला मिळाली. परंतु लस चे केंद्र वाढवण्यात आले पण या केंद्रामध्ये लस कुठे आहे असा सवाल नागरिकांनी केला आहे.

लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण नियोजन बारगळले चित्र पहायला मिळते. लसीकरण केंद्र मोकळे पडले असून, पुन्हा नागरिकांनी कधीपर्यंत लस येईल याची माहिती मात्र अद्यापही देण्यात येत नसल्याने लसीकरणाकडे नागरिक पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन हेलपाटे मारावे लागत आहे.

एकीकडे लसीचा अभाव जाणवतो तर दुसरीकडे मात्र अनेक राजकीय व्यक्ती लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रशासनाला निवेदन वर निवेदन देत आहेत. मुळात सध्या आहे ह्याच लसीकरण केंद्रावर लसीचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण काहीच केंद्रावर उपलब्ध आहेत. लसीकरणाबाबत सामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अखेर आता ज्या ज्या नेत्यांनी लसीकरण केंद्र उभारण्यात प्रयत्न केले त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना लस मिळवून देण्याचेही प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

See also  मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार. बाणेर येथील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा निश्चय...