बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.” ममता बॅनर्जी

0

पश्चिम बंगाल :

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 206 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजप 76 जागांवर आताच्या घडीला आघाडीवर दिसत आहे.

या विजयी घोडदौडीनंतर ममता बॅनर्जी यांनी म्हटलं, “हा बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.” भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. कोरोनाची स्थिती बघता शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी केला जाईल, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

ममता बॅनर्जी यांच्या या विजयामुळे देशातील इतर राज्यांमधील नेत्यांनी अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप निवडणूक निकालांबाबत आत्मपरिक्षण करेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे.

ममता दीदींनी सगळ्यांची धूळदाण उडवली – उद्धव ठाकरे

ममता जिंकल्या आहेत आणि आता कोरोनाकडे लक्ष देऊया, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ते म्हणाले, ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल.

“पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.”

See also  घरोघरी पिझ्झा जातो तर रेशन का नाही जावू शकणार ? : अरविंद केजरीवाल