मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार. बाणेर येथील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा निश्चय… 

0

बाणेर :

कोथरुड विभाग उपविभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे यांच्या शाखेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोथरुड विधानसभेची बैठक अनिकेत मुरकुटे यांच्या मनसे कचेरी येथे उत्साहात पार पडली.

पुणे महानगरपालिकेच्या २०२२ साली होणाऱ्या निवडणुकेचा बिगुल वाजला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका विषयी चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागातील लेखाजोखा या वेळी पदाधिकाऱ्यांनी मांडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक पुणे शहर व कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये कसे निवडून येतील याविषयी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या वेळेस मनसेला मिळालेल्या मतदार व त्यापेक्षा जास्त मतदार कसे वळवता येतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे, मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडले.

या बैठकी प्रसंगी मनसेचे नेते राज्य उपाध्यक्ष रणजित शिरोळे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे, कोथरुड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे आणि बाणेर बालेवाडी मधील पदाधिकारी अनिकेत मुरकुटे, शशिकांत घोडके , अभिजित चौगुले, अमित राऊत,  गणेश चव्हाण,  निलेश जाधव, अशोक दळवी, शिवम दळवी, पांडुरंग सुतार इत्यादी उपस्थित होते.

या वेळी ॲड. किशोर शिंदे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ९ मधील नागरी समस्यांकडे लक्ष देऊन वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करावे. त्यासाठी पुणे शहर मनसे कडून पुर्ण ताकत उभी केली जाईल. रणजित शिरोळे यांनी सांगितले की, प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंवाद अभियान उभारण्यात यावे.

See also  महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग ९ मधे राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढाकार : रुपाली चाकणकर