व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद कारण अस्पष्ट ?

0

जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मिडिया अप्लिकेशन व्हॉट्सअ‌ॅपवर अचानक मॅसेज जाणं बंद झाल्याने वापरकर्ते अर्थात युजर्स हैराण झाले. व्हाट्सअप्प नंतर फेसबुकसह इन्स्टाग्राम मसेजिंग अप्लिकेशनद्वारे सवांद साधता येईल यासाठी युजर्सनी त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मेसेज केले मात्र त्या अप्लिकेशनचा वापर करताना तीच समस्या जाणवत असल्याने Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम मॅसेजिंग अप्लिकेशन डाऊन झालं असल्याचे लक्षात आले. व्हॉट्सअ‌ॅपद्वारे व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग ग्रुप चॅट हे सर्वकाही अचानकपणे ठप झाल्याचे दिसले. व्हॉट्सअ‌ॅपच्या सगळ्या सेवा अचानक बंद झाल्यामुळे ट्विटरवर एकच खळबळ उडाली आहे.

काही क्षणात whatsapp down हा ट्रेण्ड ट्विटरवर सुरु देखील झाला. मात्र Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम अचानक बंद होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलंनाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे व्हॉट्सअ‌ॅप मेसेजिंगला अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे. साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

See also  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा