पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्न भोजनात चक्क गुरांचा खुराक : पुण्यात मनसे आक्रमक

0

पुणे :

पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या मध्यान्न भोजनात चक्क गुरांचा खुराक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मनसेचे पुण्यातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाचा पोषण आहारासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतलीय. तसेच या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला

“पुण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा पशुखाद्यांच्या पिशवीतून आलाय. तसेच या पोषण आहाराचा दर्जा देखील अत्यंत निकृष्ठ आहे,” असा आरोप मनसेने केलाय होता. मनसेने हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानंतर एफडीएने संबंधित धान्याचे गोडाऊन सील केले आहे. या विषयावर मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने आज (19 मार्च) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

हा प्रकार कुठे घडला?

पशुखाद्याच्या पिशव्यांमधून शालेय मध्यान्न भोजन (पोषण आहार) देण्याचा प्रकार पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 58 मध्ये घडला. प्रशासनावर शालेय पोषण आहार म्हणून पशुखाद्य पुरवण्यात आल्याचा आरोप होतोय. अन्न व औषध प्रशासनाने या पोषण आहारावर कारवाई करत गोडाऊन सील केलंय.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळेच या काळात विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहार देण्यात येतोय. मात्र, त्यातच हे प्रकरण समोर आल्याने पोषण आहार पुरवणाऱ्या यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.

या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यांनी भाष्य केलं आहे. ‘हे महाराष्ट्र सरकारच्या मध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. केवळ, हे भोजन विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यास केवळ पुणे महापालिका जबाबदार आहे. विद्यार्थ्यांसाठी जनावरांचं खाद्य पुरवणं हे दुर्भाग्य आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

 

See also  पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर...