रेशनिंगच्या दुकानासमोर लाकडी दांडक्याने मारहाण : औंध मधील प्रकार.

0

औंध

रेशनिंगच्या दुकानासमोर रांगेत थांबलेल्या ग्राहकाला ‘माझ्याकडे काय बघतो,’ असे म्हणून धमकी देऊन अन्य दोन ग्राहकांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार औंध येथे घडला.

या प्रकरणी सतीश शहाजी पवार (वय ३५, रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून अमीर शेख (रा. कस्तुरबा वसाहत, औंध) याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कस्तुरबा वसाहत येथील रेशन दुकानासमोर त्यांची बहीण व शेजारी राहणाऱ्या विशाल गायकवाड यांच्यासह रांगेमध्ये थांबले होते. त्या वेळी आरोपीने विशाल गायकवाड यांना ‘माझ्याकडे काय बघतो,’ या कारणावरून धमकी दिली. तेव्हा फिर्यादीने आरोपीला समजाविण्याचा प्रयत्न केला. आरोपी फिर्यादीला ‘थांब तुझ्याकडेही बघतो,’ असे म्हटले. तसेच, तेथील एका बोळात जाऊन आरोपीने लाकडी दांडके आणले. त्या दांडक्याने आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादीची बहीण आणि रांगेतील इतर नागरिक, दुकानदार फिर्यादीस सोडवण्याठी आले असता, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीच्या हातावर दांडके मारले; तसेच, इतर नागरिक आणि दुकानदारांच्याही अंगावर दांडके घेऊन धावून गेला. दुकानदारालाही धमकी दिली. आरोपीच्या दहशतीने रांगेतील नागरिक तेथून पळून गेले; तर दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. चतु:श्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहेत.

See also  पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक शिपाई पीएसआय म्हणून निवृत्त होईल, अशी योजना : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील