समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्पला  तत्वतः मान्यता

0

मुंबई:

मुंबई महानगराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता तसेच प्रसंगी पावसाळ्याच्या विलंबामुळे निर्माण होणाऱया पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निःक्षारीकरण प्रकल्प अर्थात समुद्राच्या खाऱया पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मा. स्थायी समितीने तत्वतः मान्यता दिली आहे.

मुंबई महानगराला वेगवेगळ्या अशा सात जलाशयांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ब्रिटिश काळापासून ते अलीकडे बांधलेली जलाशये देखील त्यात समाविष्ट आहेत. या धरणांमधील पाणीसाठा हा त्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱया पर्जन्यमानावर अवलंबून असतो. जागतिक हवामान बदलामुळे मागील काही वर्षांमध्ये पावसाळ्यास होणारा विलंब पाहता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांमधील साठा खालावल्यास मुंबईला 10 ते 20टक्के पाणीकपातीस सामोरे जावे लागते.

हा प्रकल्प मुंबईसाठी उभारण्याचा विचारविनिमय मागील काही काळापासून सुरु असतानाच या क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ व अनुभवी अशा मेसर्स आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. या कंपनीने महानगरपालिकेकडे अनाहूत (विचारणा झालेली नसताना स्वतःहून सुचवलेला) प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाचा अधिनियम  2018 च्या अनुषंगाने सादर करण्यात आला आहे. या अधिनियमामध्ये अनाहूत प्रस्ताव सादर झाल्यास त्याबाबत करावयाची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचे पालन करुन स्वीस चॅलेंज पद्धतीने स्पर्धात्मक निविदा मागवून मुंबईसाठी आता निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

1900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. 

प्रकल्पासाठी कशी जागा हवी?

प्रकल्पाचा परिरक्षण खर्च हा समुद्रातील पाण्याच्या गुणवत्तेशी थेट निगडित असल्याने मुंबईच्या किनाऱ्यालगत मात्र खाडीपासून लांब अशी जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. ही बाब पाहता मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित सुमारे १२ हेक्टर शासकीय जागा निदर्शनास आली आहे. ही जागा हस्तांतरित करण्याबाबत देखील महानगरपालिकेकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबर पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

See also  मेधा कुलकर्णी यांनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी.