अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झालं?

0

दिल्ली :

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनीही अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या की, देशाचा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे, जेव्हा देशाचा जीडीपी दोन वेळा मायनसमध्ये गेला आहे. आर्थिक मंदीचा विचारही केला नव्हता, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान दोन गोष्टींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो. पहिला आयकर स्लॅबबाबत बजेटची घोषणा आणि बजेटमुळे काय स्वस्त आणि महाग झालं आहे. यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग झालं पाहुयात.

काय महाग झालं?

मोबाईल फोन आणि मोबाइल फोनचे भाग, चार्जर्स.

गाड्याचे स्पेअर पार्ट्स

इलेक्ट्रॉनिक उपकरणे

इम्पोर्टेड कपडे

सोलार इन्व्हर्टर, सौर उपकरणे

कापूस

काय स्वस्त झालं?

पोलादी वस्तू

सोने

चांदी

तांबे साहित्य

लेदरच्या वस्तू

कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातचं बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केलं आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील.

See also  संकटकाळात सर्व जगाची मदत करणाऱ्या भारताला कोरोना संकट काळात मदत करणे सर्वांचे कर्तव्य : प्रिन्स चार्ल्स